संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात 


0
Views

संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात 

सोलापूर, दि. 23- सोलापूर जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी आसरा चौकातून ताब्यात घेतले.

 

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्याच्या बहाण्याने पोलिसांनी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले यांच्यासह प्रमुख नेत्यांना जुळे सोलापूरमधील एका हॉटेलमध्ये मुख्यमंत्र्यांचा दौरा संपेपर्यंत नजरकैदेत ठेवले.

 

 

संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूरच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समजताच गनिमी कावा करून आंदोलनाच्या तयारीत असताना आसरा चौकात करपलेले सोयाबीन गाडीत घेऊन आले असता पोलिसांनी मुख्यमंत्री यांची भेट घालतो म्हणून विश्वासात घेऊन त्यांना ताब्यात घेतले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, शहराध्यक्ष वैभव गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद शेळके, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश डोंगरे, शहर सचिव अक्षय कांबळे यांना डिटेन करून ठेवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *