0
Views

शहरस्तरीय रोलर हॉकी स्पर्धेत
गांधी नाथाचा संघ विजेता
सोलापूर, दि. 29- क्रीडा व युवक सेवा संचालक महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा, क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर व सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या सोलापूर शहरस्तरीय रोलर हॉकी स्पर्धेत गांधी नाथा रंगजी विद्यालयाच्या 19 वर्षाखालील वयोगटातून मुलींच्या संघाने विजेतेपद प्राप्त केले.
या विजयी संघामध्ये अक्षरा बंदपट्टे, अपेक्षा बंदपट्टे, आरुषी गुजर, प्राची फुले, आसावरी पतंगे, वैष्णवी हिरेमठ, पायल परबळकर, कानन शिंगाडे, श्रेया बुलबुले, प्रणाली यमपुरे, प्राची यमपुरे, साक्षी बुलबुले खेळाडूंचा समावेश आहे.या खेळाडूंना क्रीडा शिक्षक शिवानंद सुतार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या यशाबद्दल विजयी संघाचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष संजय गांधी, मुख्याध्यापिका स्मिता रणदिवे, सरोजिनी मुलींटी यांनी अभिनंदन केले आहे.













Leave a Reply