0
Views

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सान्वी,
प्रणिदी, श्रावणी, विनय, ध्रुव व संस्कार विजेते
सोलापूर, दि. 23- क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत बार्शीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.
मुलींच्या गटात बार्शीच्या महाराष्ट्र विद्यालयाची सान्वी गोरे हिने सहापैकी सहा गुण मिळवत १४ वर्षांखालील गटाचे विजेतेपद पटकावले. पंढरपूरच्या यशवंत विद्यालयाची प्रणिदी राहिरकर हिने ५.५ गुणांसह १७ वर्षांखालील गटात, तर पाकणीच्या कै. एम. शिंदे आश्रमशाळेची श्रावणी देवनपल्ली हिने सहापैकी सहा गुणांसह १९ वर्षांखालील गटात विजेतेपद मिळवले.
मुलांच्या गटात अकलूजच्या सदाशिवराव माने विद्यालयाचा विनय रणसुभे याने ५.५ गुणांसह १४ वर्षांखालील, सेंट जोसेफ हायस्कूल, बार्शीचा ध्रुव पाटील याने ५ गुणांसह १७ वर्षांखालील, तर संस्कार कांबळे याने ५ गुणांसह १९ वर्षांखालील गटाचे विजेतेपद पटकावले.
पार्क स्टेडीयम येथील जिमखाना हॉल येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेतील पहिल्या पाच क्रमांकाच्या खेळाडूंची निवड पुणे विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी झालेली आहे. यावेळी क्रीडाधिकारी इलियास पठाण, संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड, राष्ट्रीय पंच संतोष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच स्पर्धेचे प्रमुख पंच वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वगरे, युवराज पोगुल, विजय पंगुडवाले, प्रज्वल कोरे, दत्तात्रय गोरे, कर्नाक्षी जाधव, अतुल नलगे, पृथ्वीराज देशमुख, अभिजीत बावळे यांनी यशस्वीरीत्या काम पाहिले.
विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू: अंतिम निकाल: (गट, खेळाडूंचे नाव, गुण शाळेचे नाव)
१४ वर्षे मुली: सान्वी गोरे- ६, महाराष्ट्र विद्यालय, बार्शी, अन्वीगर्जे- ५, जिल्हा परिषद शाळा, कारंजे; प्रतीक्षा चाबुकस्वार – ५, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, होटगी; सिद्धी देशमुख- ५, नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल,करमाळा; तनिष्का कोळी-५ एस के केनी विद्यालय
१७ वर्षे मुली: प्रणिदी राहिरकर- ५.५ यशवंत विद्यालय,पंढरपूर, कार्तिकी थोरात-५ श्री शिवचलेश्वर प्रशाला,मैंदर्गी
सुकन्या बिराजदार- ५ श्री सिद्धाराम म्हेत्रे प्रशाला,दक्षिण सोलापूर, अनन्या उलभगत – ५ फिनिक्स पोदार लर्न स्कूल बार्शी, सृष्टी तोंडले-५ यशवंत विद्यालय,पंढरपूर
१९ वर्षे मुली: श्रावणी देवनपल्ली- ६ कै.एम शिंदे आश्रमशाळा, पाकणी, तन्वी कुंभार – ५ सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी, तेजश्री चव्हाण- ५ सदाशिवराव माने विद्यालय अकलूज, अक्षरा मोरे – ५ सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी, बेगमसाहेबा शेख – ५ शारदा माता ज्यु. कॉलेज अक्कलकोट
१४ वर्षे मुले: विनय रणसुभे- ५.५,सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज; सार्थक राऊत – ५.५, महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंत नगर,अकलूज,देवराज कन्हेरे-५, महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय, करमाळा, पर्व अग्रवाल- ५, फिनिक्स पोदार लर्न स्कूल बार्शी, वेदांत पांडेकर – ५, एमआयटी, बार्शी
१७ वर्षे मुले: ध्रुव पाटील – ५, सेंट जोसेफ हायस्कूल,बार्शी, वेद आगरकर – ५, सुलाखे इंग्लिश मीडियम, बार्शी, वैष्णव देशमुख- ५, एम एस मोहिते – पाटील प्रशाला,अकलूज, श्रीराम राऊत- ५, शिवरत्न सीबीएसई स्कूल, अकलूज, रणवीर पवार – ५, नेताजी प्रशाला, मोहोळ
१९ वर्षे मुले: संस्कार कांबळे-५, बबनरावजी शिंदे हायस्कूल, माढा, सिद्धांत चव्हाण – ५, बबनरावजी शिंदे हायस्कूल,माढा, जलजक्ष बावळे- ५, गोपाळराव देव प्रशाला,माळशिरस, आर्यन बनसोडे – ५,मा.ल.सा.म्हेत्रे प्रशाला, दुधनी, गीत शिंदे- ५, बबनरावजी शिंदे हायस्कूल,माढा.













Leave a Reply