सांगोला येथे अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन 


0
Views

सांगोला येथे अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन 

सोलापूर, दि. 29- येत्या 02 व 03 ऑक्टोबर २०२६ दरम्यान सांगोला विद्यामंदिर, सांगोला येथे सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व शिवछत्रपती कबड्डी संघ, कडलास यांच्या वतीने जिल्हास्तरीय कुमार-कुमारी निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या स्पर्धेतून सोलापूर जिल्ह्याचा संघ निवडला जाणार आहे. तर कुमार मुलांचा संघ ०८ ते ११ ऑक्टोबर २०२६ दरम्यान पालघर येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होईल. तर कुमारी मुलींचा संघ ३० ऑक्टोबर ते ०२ नोव्हेंबर २०२६ दरम्यान सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कुमार गटाची पात्रता जन्म ०५/११/२००६ व त्यानंतर, वजन ७५ किलोच्या आत असणे आवश्यक आहे. कुमारी गटाची पात्रता जन्म ३०/११/२००६ नंतर, वजन ६५ किलो आत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता सांगोला विद्यामंदिर, सांगोला येथे सर्व कागदपत्रांसह हजर राहणे गरजेचे आहे. सोबत येताना ओरिजनल आधार कार्ड, दुसरा पुरावा म्हणून दहावी/बारावीचे बोर्ड सर्टिफिकेट किंवा जन्म दाखला किंवा निर्गम उतारा व १ फोटो ही कागदपत्रे आणणे गरजेचे आहे. मुलींच्या स्पर्धा तीन ऑक्टोबर 2026 ला सकाळी नऊ वाजता होतील. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सचिन चव्हाण – 7758959494, सुनील भोरे – 9764045803, मदन गायकवाड – 7972007986, संतोष जाधव – 9850430343, जयंत मोरे – 9309714212 यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *