टेनिक्वाईट निवड चाचणी स्पर्धेत 80 विद्यार्थी सहभागी 


0
Views

टेनिक्वाईट निवड चाचणी स्पर्धेत 80 विद्यार्थी सहभागी 

सोलापूर, दि. 20- सोलापूर मनपा टेनिक्वाईट ( रिंगटेनिस) असोसिएशन सोलापूर यांच्यावतीने टेनिक्वाईट ज्युनियर मुले व मुली शहर निवड चाचणी स्पर्धा शनिवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी राजीव गांधी इनडोअर हॉल सात रस्ता येथे पार पडली. या निवड चाचणी स्पर्धेसाठी विविध शाळेतून एकूण 80 विद्यार्थी सहभागी झाले होते.

 

 

या निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन संघटनेचे मनोज बाळगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवूनव मैदानाचे पूजन करून करण्यात आले. याप्रसंगी स्पर्धाप्रमुख सुहास छंचुरे, अजित पाटील, वसीम शेख, शिवानंद सुतार, संजय पंडित, प्रचिती जोगदांडे, सोनाली उंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या निवड चाचणी स्पर्धेसाठी विविध शाळेतून एकूण 80 विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी शहर संघटनेचे अध्यक्ष मनिष सुरवसे, सचिव भीमराव बाळगे, कोषाध्यक्ष इक्बाल शेख यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेसाठी पंचप्रमुख म्हणून अजित पाटील मनोज बाळगे, सुहास छंचुरे यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पर्धा प्रमुख सुहास छंचुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवानंद सुतार यांनी मानले.

 

 

स्पर्धेत सहभागी झालेल्या शाळा 

या स्पर्धेत उमाबाई श्राविका विद्यालय, पी एस इंग्लिश मीडियम स्कूल, गांधी नाथा रंगजी विद्यालय, दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला, सोशल हायस्कूल बिडी घरकुल, सेंट जोसेफ हायस्कूल इत्यादी शाळा सहभागी झाल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *