0
Views

शालेय शहरस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला उत्साहात सुरुवात
सोलापूर, दि. 25- सोलापूर महानगरपालिका सोलापूर अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यामाने व सोलापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या सहकार्याने आयोजीत १९ वर्षांखालील शालेय शहरस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली. तिसऱ्या फेरीअखेर मुलांच्या गटात आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त मानस गायकवाड, स्वानंद तपकिरे, श्रीपाद पाटील, यथार्थ पाटील, आदित्य फडतरे, ओम पाटील, वीरधवल सुरवसे तसेच मुलींच्या गटात सृष्टी गायकवाड व पुजा घाडगे यांनी प्रत्येकी तीन गुणासह आघाडी घेतली आहे.
पार्क स्टेडीयम येथील जिमखाना हॉल येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत खेळाडूंनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक ज्ञानेश्वर म्याकल व भाजपा क्रीडा प्रकोष्ठचे जिल्हाध्यक्ष यशवंत पाथरूट यांच्यातील प्रदर्शनीय लढतीने झाले. यावेळी मनपा क्रीडाधिकारी नजीर शेख, संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड, प्रथमेश हिरापुरे, वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वगरे, युवराज पोगुल, विजय पंगुडवाले, प्रज्वल कोरे, सागर जमादार, क्रीडा संघटक संतोष खेंडे, सुभाष उपासे, एस. गायकवाड, शिवा बेलुरे, आकाश खराडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात ज्ञानेश्वर म्याकल यांनी बुद्धिबळ खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाचे महत्त्व अधोरेखित केले. क्रीडाधिकारी नजीर शेख यांनी सोलापूरच्या खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. स्पर्धेतील पहिल्या पाच क्रमांकाच्या खेळाडूंची पुणे विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे.













Leave a Reply