0
Views

शालेय शहरस्तर बुद्धिबळ स्पर्धेत
सृष्टी व मानस गायकवाड विजेते
सोलापूर, दि. 26- सोलापूर महानगरपालिका सोलापूर अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यामाने व सोलापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या सहकार्याने आयोजीत १९ वर्षाखालील शालेय शहरस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मुलांच्या गटात संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाचा आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त मानस गायकवाड याने सात पैकी सात तर मुलींच्या गटात ए. डी. जोशी कनिष्ठ महाविद्यालयाची मानांकित खेळाडू सृष्टी गायकवाड हिने पाच पैकी पाच गुण मिळवीत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.
पार्क स्टेडीयम येथील जिमखाना हॉल येथे संपन्न झालेल्या १९ वर्षाखालील मुले व मुलींच्या अतिशय अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत मानस व सृष्टी गायकवाड या बंधू-भगिनींना निर्विवादरित्या वर्चस्व राखत जेतेपद पटकाविले. तर संगमेश्वरच्या श्रीपाद पाटील याने सुरेख खेळ करत पाच गुण व सरस बुचोल्स गुणपद्धतीवर दुसरा क्रमांक पटकाविला. तसेच स्वानंद तापकिरे (इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूल), ओम पाटील (वालचंद ज्यु.कॉलेज), आदित्य फडतरे (डी.एच. बी.सोनी कॉलेज) यांनी प्रत्येकी पाच गुणांसह तिसरा चौथा व पाचवा क्रमांक प्राप्त केला.
मुलींच्या गटात संगमेश्वर ज्युनियर कॉलेजच्या काव्या पाटील हिने आकर्षक खेळत ४.५ साडेचार गुणांसह दुसरा क्रमांक प्राप्त केला. तर रत्नमाला गायकवाड (वालचंद ज्यु.कॉलेज) हिने चार गुण, तेजल चिलगुंडे (श्री. दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला) हिने ३. ५ गुण व ज्योती खंडागळे (श्री. दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला) हिने तीन गुणांसह तिसरा चौथा व पाचवा क्रमांक मिळवत आपले संघातील स्थान निश्चित केले.
स्पर्धेतील पहिल्या पाच क्रमांकाच्या खेळाडूंची निवड पुणे येथे दिनांक ७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी झालेली आहे. यावेळी मनपा क्रीडाधिकारी नजीर शेख, संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड, वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वगरे, युवराज पोगुल, विजय पंगुडवाले, प्रज्वल कोरे, सागर जमादार, क्रीडा शिक्षक सुभाष उपासे आदींची प्रमुख उपस्थिती होती.













Leave a Reply