महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत ‘नेटबॉल’च्या समावेशासाठी अधिसभेची शिफारस


0
Views

महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत

‘नेटबॉल’च्या समावेशासाठी अधिसभेची शिफारस

सोलापूर, दि. २३- आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत नेटबॉल या खेळाचा समावेश असून, सोलापुरात नेटबॉल या खेळात राष्ट्रीय पातळीवर खेळाडू घडत आहेत. त्यामुळे ​पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये नेटबॉल खेळाचा महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

 

याचा प्रस्ताव अधिसभा सदस्य अजितकुमार संगवे यांनी मांडला होता. तसेच आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत महिला संघ जात असताना व्यवस्थापिका नियुक्ती करताना क्रीडा अध्यापिका उपलब्ध होत नसतील तर व्यवस्थापन परिषद, अधिसभा, अन्य प्राधिकरणातील तसेच विद्यापीठ किंवा महाविद्यालयातील महिला अध्यापिका किंवा महिला कर्मचारी यांना नियुक्त करण्याबाबतचा प्रस्तावही मांडण्यात आला. हे दोन्ही प्रस्ताव आधिसभेने मंजूर केले आहेत. या प्रस्तावास व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. सचिन गायकवाड व अधिसभा सदस्य सिद्धेश्वर स्वामी यांनी अनुमोदन दिले. आधिसभेने या दोन्ही प्रस्तावाची शिफारस विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाकडे केली असून, या मंडळाच्या मंजुरीनंतर याची अंमलबजावणी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *