0
Views

शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत
मानांकित खेळाडूंचे आकर्षक विजय
सोलापूर, दि. 22- क्रीडा व युवक सेवा संचनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यामाने व सोलापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या सहकार्याने आयोजीत १४, १७ व १९ वर्षाखालील शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मुलींच्या गटात आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू सान्वी गोरे, सिद्धी देशमुख, प्रतिक्षा चाबुकस्वार, श्रावणी देवरपल्ली, अनन्या उलभगत यांनी विजयी सलामी दिली.
पार्क स्टेडीयम येथील जिमखाना हॉल येथे या स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक ज्ञानेश्वर म्याकल यांनी पटावर चाल करत केले. यावेळी क्रीडाधिकारी इलियास पठाण, संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड, राष्ट्रीय पंच संतोष पाटील, स्पर्धेचे प्रमुख पंच वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वगरे, युवराज पोगुल, विजय पंगुडवाले, प्रज्वल कोरे, दत्तात्रय गोरे, कर्नाक्षी जाधव, अतुल नलगे यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या अध्यक्षीय मनोगतात ज्ञानेश्वर म्याकल यांनी बुद्धिबळ खेळाचे महत्व विषद केले. तसेच खेळाडूंना उज्वल भविष्य असून सोलापुरातील खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धात नावलौकिक मिळवावे असे आवाहन करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेतील पहिल्या पाच क्रमांकाच्या खेळाडूंची निवड पुणे विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी होणार आहे. या स्पर्धेत एकूण १६५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.













Leave a Reply