0
Views

जिल्हास्तरीय ग्रामीण बॅडमिंटन स्पर्धेत
नोट्रे डॅम अकॅडेमी स्कूल एनटीपीसी तृतीय
सोलापूर, दि. 28- जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या मार्फत सांगोला येथे घेण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय ग्रामीण बॅडमिंटन स्पार्धेमध्ये नोट्रे डॅम अकॅडेमी स्कूल एनटीपीसी संघाने तिसरा क्रमांक पटकाविला आहे.
या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात एकूण 20 संघांनी भाग घेतलेला होता. नोट्रे डॅम अकॅडेमी स्कूल एनटीपीसी संघाने आतिशय चुरशीच्या सामन्यांमध्ये बाजी मारून तिसरा क्रमांक पटकाविला. विजयी संघात गुरुराज ,एस., दर्शन म्हेत्रे, पुरब शर्मा, स्वतिक अहिरवाल, स्टीफन सॅम या खेळाडूंचा समावेश होता. त्यांना प्रशालेचे क्रिडाशिक्षक रेवणसिद्ध म्हेत्रे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल नोट्रे डॅम अकॅडेमी स्कूलच्या मुख्यध्यापिका सिस्टर रंजना यांनी सर्व खेळाडुंचा गुलाबाचे फुल देऊन सत्कार केला. तसेच प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले.













Leave a Reply