राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत सोलापूर,
कोल्हापूर, पुणे, जळगावची विजयी सलामी
सोलापूर, दि. 19- येथील एन के ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ अंतर्गत राज्यस्तर अंतर विभागीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून याचे उद्घाटन सोलापूर विभागाचे चेअरमन तथा प्राचार्य डॉ. बी. के. सोनगे यांच्या हस्ते विभागीय सचिव तथा सिमेंट व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. सचिन गायकवाड, विद्यापीठाचे प्रा. निलेश भोईर, डॉ. संदीप इंगवले, प्रा. ऋचा श्रीराम, प्रा. शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी पहिल्या फेरीतील सामन्यांमध्ये पुणे विभागाने नागपूरच्या संघाचा दोन एक असा पराभव केला. तर कोल्हापुरने जळगावच्या संघाचा 2-1 असा पराभव केला.ऑर्किडने पुणे संघाचा 6-1 असा पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात ऑर्किडने नागपूर वर 3-1 असा विजय मिळवला. कोल्हापूरने छत्रपती संभाजी नगरवर 3-1 असा विजय मिळविला.
या स्पर्धा पार पाडण्यासाठी सोलापूर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे पंच, एन. के. ऑर्किड महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी नंदकुमार आहेरवाडी, प्रमोद लिगाडे, दादा पांगळे परिश्रम घेत आहेत.















Leave a Reply