श्री गगनगिरी विद्यालयाचे जिल्हास्तरीय  टेनिक्वाईट स्पर्धेमध्ये यश 

श्री गगनगिरी विद्यालयाचे जिल्हास्तरीय 

टेनिक्वाईट स्पर्धेमध्ये यश 

सोलापूर, दि. 28- क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर व श्री गगनगिरी विद्यालय सांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेमध्ये श्री गगनगिरी विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले.

 

या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा परिषद सदस्य आदिनाथ देशमुख, प्रमुख पाहुणे म्हणून शहाजी माणिक मुळे, पंचायत समिती सदस्य तसेच पंढरपूर तालुका क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड, गट शिक्षणअधिकारी रोहन कांबळे, करकंब गट विस्तार अधिकारी दशरथ मोरे, संस्थेचे संस्थापक सचिव संभाजी नाना सत्रे, विद्या विकास मंदिर उंबरेचे मुख्याध्यापक एस. के. पाटील, शिक्षण सेवक कृष्णा खुळपे, श्री गगनगिरी विद्यालय सांगवीचे मुख्याध्यापक रणदिवे ए.एस. व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्पर्धा संयोजक विष्णू दगडे व सत्रे डी. एस. उपस्थित होते.

 

सोलापूर जिल्ह्यातून अनेक संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये 14 वर्षाखालील मुलं मुली तसेच 17 वर्ष मुली व मुली 19 वर्षाखालील मुली व अमोल पब्लिक स्कूल करकंब मुलांचा संघ विजेता ठरला. त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

 

 14 वर्षाखालील मुले 

श्री गगनगिरी विद्यालय सांगवी

विद्या विकास मंदिर उंबरे पागे

फॅबटेक स्कूल सांगोला

 

14 वर्षाखालील मुली 

श्री गगनगिरी विद्यालय सांगवी

कोरवली हायस्कूल कोरवली

वेताळ विद्या मंदिर शिरशी

 

17 वर्षाखालील मुले

गगनगिरी विद्यालय सांगवी

सिंहगड पब्लिक स्कूल कमलापूर

विद्या विकास मंदिर उंबरे पागे

 

17 वर्षाखालील मुली 

श्री गगनगिरी विद्यालय सांगवी

अक्कलकोट विद्यालय अक्कलकोट

ज्ञानसाधना विद्यालय टाकळी

 

19 वर्षाखालील मुले 

अमोल पब्लिक स्कूल करकंब

श्री गगनगिरी विद्यालय सांगवी

न्यू इंग्लिश स्कूल करकंब

 

19 वर्षाखालील मुली 

श्री गगनगिरी विद्यालय सांगवी

अमोल पब्लिक स्कूल करकंब

विद्या विकास मंदिर उंबरे पागे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *