
मुलांना शेतीची माहिती अनुभवातून देणारी
अभिनव संकल्पना ‘वन डे’ फार्मर
सोलापूर, दि. 28- मोबाईल संगणकाच्या युगात अधिक वेळ घालवणार्या मुलांना शेती आणि मातीशी जोडण्यासाठी वन डे फार्मर अॅकॅडमीक एज्युकेशनल ट्रीप ही संकल्पना इंडियन रूरल हेल्थकेअर फाऊंडेशन अंतर्गत डॉ. भोजने पब्लिक स्कूल यांच्या मार्फत सुरू करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. चित्तरंजन भोजने आणि संचालिका वेणु भोजने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोलापूर शहरापासून अवघ्या 8 किलोमिटर अंतरावर असलेल्या बार्शी रोडवरील कारंबा परिसरातील स्नेहालयाच्या परिसरात हा उपक्रम सुरू करण्यात आला असून यामध्ये विद्यार्थ्यांना मनोरंजनासोबतच प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना येथे काय मिळेल
शेतीची ओळख, बीज संवर्धन, रोपवाटिका, निसर्ग निरीक्षण, ग्रामीण जीवनशैली, पर्यावरण संवर्धन, अन्ननिर्मिती आणि शेतकर्यांचे कष्टमय जीवन जवळून अनुभवता येणार आहे.
शिक्षणासोबत संस्कार आणि जीवनकौशल्याचा विकास मोबाईलच्या व्यसनापासून दूर करण्यासाठी एकाग्रता, अभ्यासातील लक्ष, सकारात्मक विचारसरणी आणि आत्मविश्वास यावर मेडिटेशन आणि ग्रामीण भागातील मैदानी खेळ यांचा यामध्ये समावेश असणार आहे. ग्रामीण ढंगातील आजीबाईच्या गोष्टींच्या माध्यमातून जुन्या काळातील संस्कार, अनुभव आणि जीवनमूल्यांची ओळख करून दिली जाणार आहे.
सकाळी 10 ते सायंकाळी 5 असा संपूर्ण दिवस प्रत्यक्ष अनुभवाचा असणार आहे. पुस्तकी ज्ञानाच्या पलिकडे जावून प्रत्यक्ष निरीक्षक कृती आणि अनुभव घेता येणार आहे. शेतकरी हा समाजाचा अन्नदाता असून आपल्या अन्नामागे शेतकर्याचे किती कष्ट असतात याची जाणीव मुलांना करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे.
वन डे फार्मर ही केवळ एक दिवसाची सहल नसून विद्यार्थ्यांच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवणारा जीवनानुभव ठरणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील आणि जिल्ह्याच्या बाहेरील सर्वच प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि शिक्षकांनी तसेच पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी वन डे फार्मरच्या सहलीसाठी नियोजन करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
आमचा मुख्य उद्देश आयुष्यभरासाठी शेतकर्यांप्रती आदराची भावना असली पाहिजे या उपक्रमातून प्रत्येक विद्यार्थी एक महत्वाचा जीवनधडा शिकणार आहे. एक दिवस शेतकरी बनून पाहूया आणि आयुष्यभर शेतकर्यांचा सन्मान करूया हा असल्याचेही भोजने यांनी सांगितले.















Leave a Reply