
ऊस दरासाठी शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी
कार्यालयामोर ठिय्या आंदोलन सुरू
सोलापूर, दि. 16- सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसले आहेत. जोपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील कारखानदार शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रति टन ३५००+१००+२००=३,८०० रूपये दर जाहिर करत नाहीत तोपर्यंत माघारी न जाण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी घेतला आहे.
ऊसाचा दर जाहिर करण्यात यावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात संघटनेचे सर्वोच्च नेते राजू शेट्टी हे देखील सहभागी झाले होते. याशिवाय रासपचे नेते महादेव जानकर, मनसेचे नेते, काँग्रेसचे नेते व पदाधिकारी देखील सहभागी झाले होते. या सर्वांनी मोर्चात कारखानदारांवर आसूड ओढले. यानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी संघटनेची बैठक झाली. या बैठकीत ऊस दराबाबत योग्य तो तोडगा न निघाल्याने निर्धार करून आलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या रात्रीच्या भोजनाची तयारी म्हणून रस्त्यावरच चूल मांडून स्वयंपाक करणे सुरू केले आहे.
दरम्यान शेतकऱ्यांच्या ऊसाला जिल्ह्यातील साखर कारखानदार अपेक्षित दर देत नसल्याने ऊस दर आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत.















Leave a Reply