
नन्हे सितारे या स्पर्धेत अंत्रोळीच्या
चांद सय्यद याची जिल्हास्तरावर निवड
सोलापूर, दि. 28- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंत्रोळी येथील इयत्ता सातवीतील विद्यार्थी चांद गुलाब सय्यद याने ओपन लिंक फाउंडेशनच्या विनोबा ॲपद्वारे आयोजित नन्हे सितारे या स्पर्धेत स्पोकन इंग्लिश या विषयांमध्ये तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावीत घवघवीत यश मिळवले. जिल्हास्तरावर त्याची निवड झाली आहे.
या यशाबद्दल शाळेत त्याचा भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. चांद यांस वर्ग शिक्षिका कीर्ती जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शिक्षणाधिकारी विशाल मुळे, गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार, विस्तार अधिकारी गुरु बाळा सनके, केंद्रप्रमुख राजेंद्र कांबळे, मुख्याध्यापक युवराज राठोड, शिक्षक श्रीरंग बनसोडे, कीर्ती जाधव, नागनाथ म्हमाणे, मीनाक्षी राठोड, पुष्पा बनसोडे यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षिकांचे अभिनंदन केले.















Leave a Reply