शाळांना जागा व इमारतीसाठी निधी द्या 

शाळांना जागा व इमारतीसाठी निधी द्या 

कास्ट्राईब शिक्षक संघटनेची सीईओंकडे मागणी

सोलापूर, दि. 27- शहरातील कंत्राटी पद्धतीने भाड्याने घेतलेल्या जागेत चालवल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांना डीपीडीसी आणि समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कायमस्वरूपी जागा व इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

 

संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शहरी हद्दवाढ भागात खालील शाळा भाड्याच्या जागेत चालत असून तेथे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

अ.क्र. शाळेचे नाव पटसंख्या मंजूर शिक्षक

1 जि.प. शाळा शेटे वस्ती 30 : 2

2 जि.प. शाळा संगमेश्वरनगर 24 : 2

3 जि.प. शाळा बागवान नगर 24 : 2

या शाळा सध्या भाडे तत्वावर चालविण्यात येत असून त्याचे भाडे संबंधित शाळेतील शिक्षक स्वखर्चातून देतात.यापूर्वी भाडे जिल्हा परिषद कडून अदा करण्यात येत होते.ऑनलाइन पगार सुरू झाल्यामुळे शाळेचे भाडे बंद करण्यात आले आहे. तरी या शाळांना डीपीडीसी व समग्र शिक्षा अभियानातून निधी मिळावा. तसेच या संदर्भातील निवेदन मेलद्वारे पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार प्रणिती शिंदे यांना मेलद्वारे पाठवले आहे. दोन्ही नेते मंडळी सोलापूर शहरात आल्यावर प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात येणार आहे.

 

 

या प्रसंगी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष श्रीशैल कोरे, जिल्हा सचिव सोमलिंग कोळी, जेष्ठ मार्गदर्शक शरद नरगिडे, शहर अध्यक्ष पवन कांबळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *