निर्भया पथकाचा अंत्रोळी शाळेत संवाद 

निर्भया पथकाचा अंत्रोळी शाळेत संवाद 

सोलापूर, दि. 30- जि. प. प्रा. शाळा अंत्रोळी, येथे आज मंद्रूप पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकातील पोलीस कॉन्स्टेबल विशाल सावंत यांनी शाळेस सदिच्छा भेट देऊन विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्याशी सुसंवाद साधला.

 

शिक्षक, पालक यांच्यात अंतरक्रिया होणे गरजेचे आहे, त्यातून शाळेचा व गावाचा विकास होण्यास मदत होईल असे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. विद्यार्थ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता स्वतःचे संरक्षण केले पाहिजे. तसेच अनोळखी व्यक्तींना न बोलणे त्यांच्याकडून कोणतेही खाद्यपदार्थ न घेणे, अनोळखी व्यक्तीच्या गाडीवर न बसणे, अशा प्रकारचा सुरक्षिततेचा सल्ला सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना दिला, देश व गावाचे भविष्य घडवणारे या शाळेतील विद्यार्थी नक्कीच मोठ्या पदावर काम करतील व गावाचे नाव उज्वल करतील यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. दररोज शाळेची शिस्त, स्वच्छता, गणवेश व अभ्यास या गोष्टी महत्त्वाच्या आहेत असेही सांगितले.

 

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक युवराज राठोड यांनी शाल देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी गावातील समाजसेविका कल्पना सोनकवडे, शिक्षक श्रीरंग बनसोडे, नागनाथ म्हमाणे, मीनाक्षी राठोड, पुष्पा बनसोडे, सुषमा कुंभार व पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *