
अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार करणाऱ्या
तरूणास 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
सोलापूर, दि. 23- अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तरूणास विशेष न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांनी १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
विजय हनुमंत उर्फ हणमंतराव पुजारी (वय ३२, रा. श्रीशैल नगर भवानी पेठ, सोलापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पिडीतेच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यातील पिडीत अल्पवयीन मुलीस २७ नोव्हेंबर २०१८ रोजी विजय पुजारी याने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. पळवून नेल्यानंतर पिडीतेच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरुन जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीसांनी तपास करून विजय पुजारी व पिडीतेस शोधून काढून तपास केला. त्यावेळी विजय पुजारी याने पिडीतेवर अत्याचार केल्याचेही निष्पन्न झाल्याने याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात पोस्को व अत्याचाराच्या कलमानुसार पोलीसांनी तपास करून सहायक पोलीस निरीक्षक राठोड यांनी न्यायालयात दोषारोपपत्र पाठवून दिले.
याची सुनावणी विशेष न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांच्यासमोर झाली. याप्रकरणी सरकारच्यावतीने १४ साचीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षी व सरकारी वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश भजने यांनी आरोपी विजय पुजारी यास १० वर्षे सक्तमजुरी व ५००रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकारच्या अॅङ शितल डोके यांनी तर आरोपीच्यावतीने अॅड राजेंद्र फताटे यांनी काम पाहिले तर कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस कर्मचारी व्ही. बी. काळे, मैदर्गी व अनिता काळे यांनी काम पाहिले.
















Leave a Reply