आगळगावात रेड्यांच्या टकरीत रेडा ठार
बार्शी, दि. 16- बार्शी तालुक्यातील आगळगाव येथील धनगरवाडी वस्तीवर रविवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी दुपारी रेड्यांच्या टकरी सुरू असताना दुर्दैवी घटना घडली. या टकरीदरम्यान एका रेड्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, प्राण्यांच्या सुरक्षिततेचा आणि कायद्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
धनगरवाडी वस्तीवर झालेल्या या रेड्यांच्या टकरी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. टकरीदरम्यान रेड्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० मधील कलम ११ नुसार प्राण्यांना अनावश्यक वेदना किंवा यातना देणे तसेच केवळ मनोरंजनासाठी प्राण्यांना एकमेकांशी लढण्यास प्रवृत्त करणे हा दंडनीय प्रकार ठरू शकतो. त्यामुळे धनगरवाडी येथे झालेल्या रेड्यांच्या टकरींच्या कार्यक्रमाची कायदेशीर चौकशी करावी अशी मागणी पुढे येत आहे. तसेच मुक्या प्राण्यांच्या जीवाशी खेळ थांबणार कधी? हा प्रश्न या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.















Leave a Reply