आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत  सिंहगडची किरण सुरवसे प्रथम

आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत 

सिंहगडची किरण सुरवसे प्रथम

सोलापूर, दि. 26-सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ व महात्मा ज्योतिबा फुले जन्म द्विशताब्दी समिती, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.

 

 

 

यात विद्यार्थिनी किरण सुरवसे हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिला रोख पाच हजार रुपये, ग्रंथ, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याच स्पर्धेत महाविद्यालयाचा विद्यार्थी आदित्य नागणे याने उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक मिळविला. त्याला रोख एक हजार रुपये, ग्रंथ, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

 

 

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्म द्विशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा, सामाजिक विचारांचा आणि शैक्षणिक योगदानाचा जागर तरुणाईमध्ये व्हावा, या उद्देशाने संतोष भीमराव पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मंगळवेढा येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेसाठी महात्मा फुले यांचे विचार, आजची शिक्षणव्यवस्था, कृषिविषयक विचार, छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे विचार आणि सामाजिक क्रांतीतील योगदान असे विविध विषय देण्यात आले होते.

 

 

या यशाबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ शंकर नवले, उपप्राचार्य डॉ रवींद्र व्यवहारे, निबंधक डॉ.‌ डी. आय. नवले, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. यशपाल खेडकर, विविध विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सिंहगड परिवारातर्फे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *