डी बा टू तंत्रशिक्षण विद्यापीठ राज्यस्तर फुटबॉल स्पर्धेत सोलापूर झोन विजेता

डी बा टू तंत्रशिक्षण विद्यापीठ राज्यस्तर

फुटबॉल स्पर्धेत सोलापूर झोन विजेता

सोलापूर, दि. 21- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ लोणेरे रायगड अंतर्गत पार पडलेल्या राज्यस्तर आंतरविभागीय फुटबॉल स्पर्धेत सोलापूर विभागाने विजेतेपद खेचून आणले तर कोल्हापूर विभागास उपविजेतेपद मिळाले.

 

या स्पर्धा एन. के. ऑर्किड इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी सोलापूर येथे टर्फोवर तसेच प्रकाश झोतात संपन्न झाल्या. या स्पर्धेत राज्यभरातून नागपूर विभाग, जळगाव, पुणे, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, सोलापूर या संघाचा समावेश होता. लीग पद्धतीने पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये दोन्ही गटातून अंतिम फेरीत सोलापूर विरुद्ध कोल्हापूर दाखल झाले.

 

प्रकाश झोतात सुरू झालेल्या अंतिम सामन्यांमध्ये निर्णायक वेळेमध्ये दोन्ही तुल्यबळ संघाने अतिशय चुरशीने प्रदर्शन केले. मात्र निर्धारित वेळेत एकही गोल होऊ शकला नाही. पेनल्टी शूट आउट वर सुरुवातीला पाच पेनल्टी शूट दोन्ही संघांना देण्यात आले. मात्र यामध्ये दोन दोन गोल अशी बरोबर झाली. त्यानंतर सडन डेथ मध्ये सोलापूर विभागाने गोल करत विजय खेचून आणला. यामध्ये प्रामुख्याने आराफत शेख, तनिष्क रोडे, गणेश, गौतम, सूरज माडे यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. तर गोल रक्षक श्रेयश कुलकर्णी यांनी कोल्हापूरचे आक्रमण पूर्णपणे थोपवले. तर कोल्हापूर कडून असद जामदार, रोहित कलंत्री यांनी जोरदार आक्रमण करत विजयासाठी प्रयत्न केले.

 

स्पर्धेचे बक्षीस वितरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. के. सोनगे, उपप्राचार्य डॉक्टर एस. एस. मेतन यांच्या हस्ते झोन सचिव प्रा.सचिन गायकवाड, ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर डॉ. आर. आर. पाटील, प्रा. एस. एस. जामदार, डॉ. संदीप इंगवले, प्रा. निलेश भोयर, प्रा. शिवशरण कोरे यांच्या उपस्थितीत जल्लोषात संपन्न झाला. या स्पर्धा पार पाडण्यासाठी फुटबॉल संघटनेचे पंच, दादा पांगळे, प्रमोद लिगाडे, प्रतीक डांगे, सौरभ पांढरभिसे यांच्यासह खेळाडू शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *