देगाव येथे कोल्ह्याने घेतला वृद्धाचा चावा 


0
Views

देगाव येथे कोल्ह्याने घेतला वृद्धाचा चावा 

गणपती विसर्जन करताना घडली घटना 

मोहोळ, दि. 28- नुकताच लाडक्या गणरायाला राज्यभरात वाजत -गाजत निरोप देण्यात आला. दरम्यान गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या एका वृद्धाचा कोल्ह्याने चावा घेतल्याने वृद्ध जखमी झाल्याची घटना मोहोळ तालुक्यातील देगाव येथे घडली. जगदीश प्रभाकर माळबागकर असे त्या वृद्ध इसमाचे नाव आहे.

 

या घटनेची अधिक माहिती अशी की जगदीश प्रभाकर माळबागकर हे देगाव परिसरात गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी गेले होते. दरम्यान सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अचानक तेथे आलेल्या कोल्ह्याने त्यांच्या उजव्या पायाचा चावा घेतला. यानंतर त्यांनी नरखेड येथील सरकारी रुग्णालयात उपचार करून ते स्वतः शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल झाले. या घटनेची नोंद शासकीय रुग्णालयात झाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *