पुणे- सोलापूर महामार्गावर कंटेनरची स्विफ्ट कारला धडक


0
Views

पुणे- सोलापूर महामार्गावर

कंटेनरची स्विफ्ट कारला धडक

सोलापूर, दि. 13- आज रविवार १३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भुईंजे गावाच्या हद्दीत यू पी ढाब्यासमोर पुण्याहून सोलापूर येथे जाणारी एक स्विफ्ट कार क्रमांक MH 12 MW 2657 ने अचानक लेन बदलल्यामुळे पाठीमागून येणाऱ्या एका कंटेनर क्रमांक NL 01 AE 1567 ने स्विफ्ट कारला धडक दिल्याने मोठा अपघात घडला.

 

 

या अपघातात कारवरील कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्यामध्ये असणाऱ्या दुभाजकामध्ये गेली असून सुदैवाने या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाही. या अपघाताची माहिती वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिका पथक डॉ. महेंद्र ताकतोडे याआणि रुग्णवाहिका चालक नागनाथ भालेराव तसेच टेंभूर्णी पोलिस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी जगताप, सरडे आणि मोडनिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी उमेश पवार (PSI) तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती. वरवडे टोल नाका येथील क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त कार आणि कंटेनर रस्त्याच्या बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *