0
Views

सापटणे येथील अपघातात तरुण ठार, तिघेजण जखमी
सोलापूर, दि. 21- पुणे- सोलापूर महामार्गावर सापटणे गावाच्या हद्दीत एच पी पेट्रोल पंपाजवळ एका महिंद्रा कारची कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघात तीन तरुण गंभीर जखमी तर एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या अपघाताची अधिक माहिती अशी की आज सोमवार दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सापटणे गावाच्या हद्दीत एच पी पेट्रोल पंपाजवळ मोहोळ येथून टेंभूर्णीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या महिंद्रा स्कार्पियो कार क्रमांक MH 42 BN 5112 ने पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनर क्रमांक TS 08 UB 4478 ला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात स्कॉर्पिओमधील तीन तरुण डोक्याला, छातीला, हाताला, पायाला जबर मार लागून गंभीर जखमी झाले असून हा अपघात एवढा भीषण होता की कारचा पुढील भाग हा कंटेनर खालीच अडकला असल्याने पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. या कारमधून प्रवास करणारे तरुण स्कार्पिओमध्येच अडकले होते. वरवडे टोल नाका येथील क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त कारचे दरवाजे तोडून जखमी तरुणांना कारमधून बाहेर काढण्यात आले असून या अपघातामध्ये जखमी झालेल्या दोन तरुणांना वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉ. प्रशांत कारंजकर आणि रुग्णवाहिकाचालक सागर फाटे यांनी तर एका गंभीर जखमी तरुणाला वेणेगाव येथिल जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिजधाम या रुग्णवाहिकेमधून टेंभुर्णी येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील ग्रस्थीपथक संतोष खडके, चालक अभिजीत गुजरे सहाय्यक नवनाथ मोरे आणि मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे अधिकारी किरण आवताडे (PSI) आणि कर्मचारी पो हे सचिन आतकर , पो ना सुनील माने, पो हे कॉ हनुमंत चौधरी, पो हे कॉ पांडुरंग जगताप तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त स्कार्पिओ कार ही कंटेनरला पाठीमागून जोरदार धडकल्याने कंटेनरखालीच अडकली होती वरवडे टोल नाका येथील गस्तीपथकाने वरवडे टोल नाका येथील क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त कार कंटेनरच्या खालून बाजूला काढून सदर अपघातग्रस्त स्कॉर्पिओ कार मधील जखमींना बाहेर काढून तात्काळ पुढील उपचारासाठी टेंभुर्णी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.
अपघातातील मयत, जखमींची नावे
या अपघातामध्ये डोक्याला, पायाला, पोटाला, जबर मार लागल्याने कर्ण महेश पवार ( वय २३ वर्षे, रा. मोहोळ ) या गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्यांमध्ये अनिकेत लक्ष्मण धोत्रे (वय २३ वर्षे), रोहित विजय मोरे (वय २१ वर्षे ), कर्ण महेश पवार ( वय २३ वर्षे,सर्वजण रा. मोहोळ ) येथील रहिवासी असून या अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलिस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी जगताप यांना वरवडे टोल नाका येथील ग्रस्तिपथकाचे प्रमुख संतोष खडके यांनी दिली आहे.
















Leave a Reply