मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांनी  तहसीलदारांच्या कक्षातील खुर्ची जाळली 


0
Views

मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांनी 

तहसीलदारांच्या कक्षातील खुर्ची जाळली 

उमरगा, दि. 10- मराठा आरक्षण आंदोलनाची धग वाढत असल्याचे दिसत असून बुधवारी मराठा आंदोलकांनी उमरगा तहसील कार्यालयात प्रवेश करून तहसीलदारांच्या कक्षातील खुर्ची बाहेर आणून त्यावर ज्वलनशील द्रव ओतून ती खुर्ची पेटवून दिली.

 

 

 

आंदोलकांनी एक मराठा.. लाख मराठा अशा घोषणा देत कार्यालयात प्रवेश केला. या आंदोलकांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना न जुमानता तहसीलदारांच्या कक्षातील खुर्ची बाहेर मैदानात आणून पेटवून दिली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनात घोषणाबाजी केली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अण्णासाहेब पवार, महादेव माने, विठ्ठल पवार तिघेही (राहणार नाईचाकूर, तालुका उमरगा) आणि वैजिनाथ काळे (राहणार माडस, तालुका उमरगा ) यांना ताब्यात घेतले. यानंतर नायब तहसीलदारांनी दिलेल्या फिर्यादीवरून या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. या घटनेनंतर तहसील कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. या चारही आंदोलकांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *