0
Views

मनसे नेते प्रशांत इंगळे यांचा खळबळजनक दावा
सोलापूर, दि. 28- सोलापूर शहर आणि जिल्ह्यात बोगस बिनशेती आदेश तयार करणारे माफिया रॅकेट असल्याचा व त्याद्वारे बोगस बिनशेती लेआउट मधील प्लॉटची बेकायदेशीर खरेदी विक्री सुरू असल्याचा खळबळ जनक दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
प्रशांत इंगळे यांनी यावेळी सांगितले की सोलापुरातून चेन्नई ग्रीन कॉरिडॉर, सोलापूर रिंग रोड व रेल्वे या तिन्हीच्या भूसंपादनात बिनशेती असलेल्या जमिनीला मोबदला जास्तीत जास्त मिळतो म्हणून ग्रीन झोन असलेली जमीन सुद्धा यलो झोन दाखवून बोगस बिनशेती आदेश तयार करण्यात आले आहेत. बोगस मोजणी, लेआउट तयार केले आहेत. सोलापुरातील तहसीलदार यांचे बोगस सही शिक्के तयार करून जमीन मालक, मंडल अधिकारी, तलाठी यांच्या संगनमताने उतारे फोड करून शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडविला आहे. उत्तर व दक्षिण सोलापूर सोलापूर मध्ये 100 ते 200 बोगस बिनशेती लेआउट मधील बेकायदेशीर खरेदी विक्री सुरू आहे. अंदाजे तीन ते पाच हजार कोटीचा हा भ्रष्टाचार माफियांकडून झाला आहे. या प्रकरणात चार ते पाच इसम, काही शासकीय अधिकारी देखील सामील आहेत. त्यांच्यावर फौजदारी कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
















Leave a Reply