0
Views

प्रतिकात्मक छायाचित्र
भांडणात बायकोने घेतला नवऱ्याच्या हाताला चावा
सोलापूर, दि. 20- घर म्हटलं की भांड्याला भांडं वाजणारच. नवरा-बायको यांच्या वाद नसेल किंवा भांडणं नसतील तर तो संसार कसला. मात्र या भांडणाचे पर्यवसान जेव्हा हाणामारीत होते त्यावेळी दवाखान्याची पायरी चढावी लागते. सोलापुरातील अशाच एका नवरा-बायकोच्या भांडणात बायकोने नवऱ्याच्या हाताला चावा घेतल्याने नवऱ्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करावे लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
ही घटना सोलापुरातील विनायक नगरा जवळील पेट्रोल पंपाजवळ घडली. महेश लक्ष्मण सर्वगोड ( वय 30 ) असे जखमी झालेल्या पतीचे नाव आहे. सर्वगोड नवरा बायको मध्ये काही कारणावरून जोराचा वाद झाला. या वादातून हाणामारी सुरू झाली. त्यातच बायकोने नवऱ्याच्या उजव्या हाताचा चावा घेतल्याने तो जखमी झाला. त्याला उपचारासाठी त्याची आई वैशाली यांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. महेश सर्वगोड याला पत्नीने तर चावा घेतलाच शिवाय आणखी एकाने त्याला लाथा बुक्क्याने मारहाण केल्याने जबर मार लागला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
















Leave a Reply