यशस्वी राठोड हिला तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण पदक


0
Views

यशस्वी राठोड हिला तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण पदक

सोलापूर, दि. 30- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर व सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आलेल्या सोलापूर शहरस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये गांधी नाथा रंगजी कॉमर्स अँड सायन्स जुनिअर कॉलेज सोलापूर येथील खेळाडू यशस्वी चंदन राठोड हिने तायक्वांदो स्पर्धेत 19 वर्षी खालील वयोगटात सुवर्णपदक पटकावले आहे. सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल तिची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

 

यशस्वी राठोड हिला क्रीडा शिक्षक शिवानंद सुतार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल पदकप्राप्त खेळाडू व मार्गदर्शक यांचे संस्थेचे अध्यक्ष संजय गांधी प्राचार्य स्मिता रणदिवे, अमोल कांबळे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच पुणे विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *