मोबाईलचे नेटवर्क गेल्याने महिलेने उचलले ‘ हे ‘ टोकाचे पाऊल 


0
Views

मोबाईल रील्स पाहत बसलेल्या माहिलेचे प्रतिकात्मक छायाचित्र

 

मोबाईलचे नेटवर्क गेल्याने महिलेने उचलले ‘ हे ‘ टोकाचे पाऊल 

कोरबा, दि. 9- सध्या लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्याने मोबाईलवर रील्स पाहण्याचे वेड सर्वांनाच लागल्याचे दिसून येते. मोबाईलवर तासनतास रील्स पाहत बसणे म्हणजे पैसे देऊन मती गुंग करून घेणे असेच आहे. त्यातच रील्स पाहताना नेटवर्क गेल्याने अनेकांची चिडचिड होते. ही चिडचिड एखाद्याचा जीव घेणारी ठरली तर काय होईल. होय घडलेही असेच आहे. रील्स पाहताना नेटवर्क गेल्याने एका ज्येष्ठ महिलेने आत्महत्या केल्याची घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे.

 

 

 

या घटनेची अधिक माहिती अशी की छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील केराकछार गावात मंगलो बाई सारथी ही 52 वर्षीय महिला नेहमीप्रमाणे मोबाईलवर रील्स पाहत बसली होती. रील्स पाहत असताना नेटवर्क बंद पडल्याने रागाच्या भरात या महिलेने कीटकनाशक प्राशन केले. आपल्या घरात मोबाईलवर रील्स पाहताना नेटवर्क वारंवार जात असल्याने तिने संतापून आपला मोबाईल जमिनीवर आदळून फोडला. त्यानंतरही राग न गेल्याने तिने घरातील कीटकनाशक प्राशन केले. यानंतर तिला वेदना होऊ लागल्याने तिच्या मुलीने घरातील अन्य सदस्यांना याबाबतची माहिती दिली. तिच्या कुटुंबीयांनी संबंधित महिलेला लगेचच प्राथमिक आरोग्य केंद्रात, त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. करतला पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

 

 

अशा दुर्दैवी घटना पाहून मोबाईलचे वाढते व्यसन आपल्याला कुठे घेऊन जात आहे हे प्रत्येकाने तपासणे गरजेचे आहे. मोबाईलचा गरजेपुरता वापर होणे अपेक्षित असताना त्यात पूर्णपणे बुडून जाणे चुकीचे आहे. अशा घटना पाहून समाजाला नव्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे हे वास्तव आहे. अशा घटना टाळून मोबाईलचा अतिरेक करणे यावर काय उपाययोजना करता येतील याचा तज्ज्ञांनी शोध घेणे गरजेचे बनले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *