0
Views

व्हिडीओ पहा
सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा
26 ग्राहकांवर कारवाई
सोलापूर, दि. 6 – उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव येथे असलेल्या सुखसागर ऑर्केस्ट्रा बार या बारवर पोलिसांनी आज रविवारी पहाटेच्या सुमारास छापा घालून 15 महिला व 26 ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई विशेष पथकाने केली.
सुखसागर ऑर्केस्ट्रा बारमध्ये महिला अंगावर तोकडे कपडे घालून, बिभत्सपणे अश्लील हावभाव करीत हिंदी व मराठी गाण्यांच्या तालावर नृत्य करीत असल्याचे तसेच ग्राहकांकडून महिलांच्या अंगावर नोटा उधळल्या जात असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघण होत असल्याचे आढळून आले. कारवाईदरम्यान येथे उपस्थित असलेल्या महिला व ग्राहकांची चौकशी करून त्यांची नावे, पत्ते निष्पन्न करण्यात आली आहेत. घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल हँडसेट व इतर साहित्य असा एकूण 28 लाख 25 हजार 10 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा विधीन पोलीस उपअधीक्षक गणेश शिंदे, सपोनी विश्वजीत भोसले, मसपोनि शारदा घोळवे, सपोनि प्रवीण जर्दे, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण वाळके, पोलीस शिपाई निलेश जानकर, आदित्य कांबळे, अनिल पवार यांनी केली असून या कारवाईमध्ये सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांनी सहकार्य केले आहे.
















Leave a Reply