0
Views

हत्तुरे वस्तीत माकडाच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी
सोलापूर, दि. 5-
राहत्या घराच्या गच्चीवर जाऊन थांबणे एका व्यक्तीला चांगलेच अंगलट आले आहे. कारण गच्चीवर गेल्यानंतर अचानक माकडाने हल्ला केल्याने संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना सोलापुरातील हत्तुरे वस्ती येथे घडली आहे.
रेवणसिद्धेश्वर मल्लप्पा न्यामगोंडे (वय 47) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते 3 सप्टेंबर रोजी आपल्या राहत्या घराच्या गच्चीवर थांबले होते. त्यावेळी माकडाने अचानक त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान माकडाने अचानक हल्ला केल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. माकड कोणीकडून तरी येऊन आपल्यावर हल्ला करेल या भीतीपोटी अनेक जण घराच्या गच्चीवर जाणे टाळत आहेत. तरी वनविभागाने या माकडाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून होत आहे.
















Leave a Reply