0
Views

प्रातीनिधीक छायाचित्र
कुत्र्याला रस्त्यावर फिरवणे वृद्धाला पडले महागात
सोलापूर, दि 3- आपल्या घरातील पाळीव कुत्र्याला बाहेर रस्त्यावर फिरायला आणणे हे सोलापुरातील एका वृद्धाला चांगलेच महागात पडले आहे. कारण त्या वृद्धाची गळ्यातील तब्बल दीड लाख रुपयेहुन अधिक किमतीची सोन्याची साखळी चोरट्यांनी लांबवल्याने त्या वृद्धाला पश्चाताप करण्याची वेळ आली आहे.
त्याचे झाले असे की नागनाथ अंबाजी गोरट्याल (वय 59 ) हे राहत असलेल्या न्यू पाश्चा पेठ परिसरात रात्रीच्या वेळी आपल्या कुत्र्याला घेऊन घराबाहेर पडले होते. ते चालत जात असताना दुचाकीवरून पाठीमागून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला. त्या सोनसाखळीची किंमत अंदाजे 1 लाख 60 हजार रुपये इतकी आहे. यानंतर घाबरलेल्या नागनाथ गोरट्याल यांनी जेलरोड पोलीस ठाणे गाठत चोरीची फिर्याद दिली. यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान पाळीव कुत्रा हा आपल्या घरातीलच एक सदस्य असताना बहुतेक सगळीकडेच लोकांकडून त्याला मलमूत्र विसर्जन करण्यासाठी घराबाहेर फिरायला जाणीवपूर्वक आणले जाते. त्याचा परिसरातील लोकांना कायम त्रासच होत असतो. आता अशा घटना घडत असताना कुत्रा पाळणारे लोक यातून काही बोध घेणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.
















Leave a Reply