दिवाळीसाठी शोभेच्या दारू विक्रीच्या तात्पुरत्या परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन


0
Views

दिवाळीसाठी शोभेच्या दारू विक्रीच्या तात्पुरत्या

परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर, दि. 25- सोलापूर जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) सन 2026 च्या दिवाळी सणानिमित्त शोभेच्या दारू विक्रीसाठी (फटाके विक्रीसाठी) तात्पुरते परवाने देण्यात येणार आहेत. या परवान्यांसाठी विहित नमुन्यातील LE-5 अर्ज सेतू कार्यालय, जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर येथे दि. 5 ते 15 ऑक्टोबर 2026 या कालावधीत (सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

 

अर्जदारांनी अर्जातील माहिती पूर्णपणे भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत. यामध्ये दोन छायाचित्रे, ग्रामपंचायत/नगरपालिका/नगरपरिषद यांचे विहित मुद्द्यांबाबतचे ना-हरकत प्रमाणपत्र, 18 वर्षे पूर्ण झाल्याचा वयाचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला/जन्मदाखला), संबंधित जागेचा 7/12 उतारा किंवा मिळकत उतारा व नकाशा, जागेबाबत स्थानिक प्राधिकरणाचे संमतीपत्र तसेच स्वयंघोषणापत्र यांचा समावेश आहे.

 

अर्जाच्या चौकशीनंतर रु. 600/- परवाना शुल्काचे चलन भरून तसेच यापूर्वी काढलेल्या परवान्याची प्रत इत्यादी कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, सात रस्ता, शासकीय दूध डेअरी शेजारी, सोलापूर येथे दि. 5 ते 19 ऑक्टोबर 2026 या कालावधीत (सुट्टीचे दिवस वगळून) सादर करावेत.

 

हे परवाने देण्यापूर्वी पोलीस विभागाचा चौकशी अहवाल प्राप्त होणे आवश्यक आहे. त्यामुळे निर्धारित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. तसेच संपूर्ण प्रक्रियेदरम्यान शासन व न्यायालयाकडून प्राप्त निर्देश, अटी व शर्ती तात्पुरत्या परवानाधारकांवर बंधनकारक राहतील. शासन व न्यायालयाच्या निर्देशानुसार परवाने देण्याबाबत परवाना प्राधिकारी अंतिम निर्णय घेतील. अधिक माहितीसाठी गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, सात रस्ता, शासकीय दूध डेअरी शेजारी, सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *