0
Views

राम मंदिरास दिलेला 4 कोटी रुपयांचा चेक निघाला बोगस
अयोध्या, दि. 31-
एकीकडे राम मंदिरातील देणग्या चोरीला जात असल्याची घटना उघडकीस आल्यानंतर आता चेन्नईच्या एका महिलेने राम मंदिर ट्रस्टला दिलेला 4 कोटी रुपयांचा धनादेश संबंधित महिलेच्या बँक खात्यात पैसेच नसल्याने बाऊन्स झाल्याने राम मंदिर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
त्याचे असे झाले की अयोध्येतील श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राला चेन्नई येथील एका महिला भाविकाने 4 कोटी रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र तिच्या खात्यात केवळ 3 रुपये असल्यामुळे तो धनादेश वटला नाही. त्या महिलेने राम मंदिरातील कर्मचाऱ्यांसाठी सुविधा पुरवण्यासाठी हा धनादेश दिला होता. तसे लेखी आश्वासन देखील तिने मंदिर ट्रस्टकडे मागितले होते. मात्र ट्रस्टने तसे कोणतेही आश्वासन दिले नाही. आता तो धनादेश वटला नाही म्हणून ट्रस्ट तिच्याशी चर्चा करून हा वाद मिटवून घेण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे बँक देखील संबंधित महिलेला नोटीस देण्याच्या तयारीत असल्याचे पुढे आले आहे.
दरम्यान दोन महिन्यांपुर्वी मंदिरात झालेल्या देणग्या चोरी प्रकरणात 8 जणांना अटक करण्यात आली आहे. यातील ड्रायवर आणि पाणी विक्रेते यांनी यात हात साफ करत पैसे शिताफिने चोरी केले होते. त्यानंतर त्या पैशांतून आलिशान गाड्या आणि घरे घेतली होती. तर मुख्य आरोपीने हे पैसे डान्सबारवर उधळले होते. विशेष म्हणजे दर महिन्यात राम मंदिराला कमीत कमी 3 ते 4 कोटी रुपयांची रक्कम देणगी स्वरूपात मिळते. देणगी चोरीच्या घटनेनंतर यात चांगलीच घट झाल्याचे दिसून आले आहे.
















Leave a Reply