पुणे विभागीय तायक्वांदो स्पर्धेत रावजी सखाराम हायस्कूलच्या सानिका गायकवाडला सुवर्णपदक


0
Views

पुणे विभागीय तायक्वांदो स्पर्धेत रावजी सखाराम हायस्कूलच्या सानिका गायकवाडला सुवर्णपदक

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड

सोलापूर, दि. 6- पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या शालेय विभागीय तायक्वांदो स्पर्धेत सोलापूरच्या रावजी सखाराम हायस्कूलची खेळाडू सानिका गायकवाड हिने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

 

या विभागीय स्पर्धेत सोलापूर शहराचे प्रतिनिधित्व करताना सानिकाने अत्यंत चुरशीच्या सामन्यांमध्ये मातब्बर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत प्रथम क्रमांक पटकावला. या दैदिप्यमान यशामुळे तिची अकोला येथे होणाऱ्या आगामी राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

 

 

सानिकाच्या या यशामुळे रावजी सखाराम हायस्कूलच्या आणि सोलापूर शहराच्या क्रीडा शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिने हे यश सातत्यपूर्ण आणि नियमित सराव, कडक शिस्त, जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर संपादन केले आहे. तिला या स्पर्धेसाठी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक अझहर शेख, तायक्वांदो प्रशिक्षक सोमनाथ बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले.

 

 

सानिका गायकवाड हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचेव मार्गदर्शक प्रशिक्षकांचे रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे कार्याध्यक्ष संजीव पाटील, थोर देणगीदार बलदवा शेठजी, स्कूल कमिटी सदस्य केतन शहा, धीरज जवळकर, माधुरी पाटील, विद्यालयाचे प्राचार्य भारत केत यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष अभिनंदन केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *