0
Views

शालेय तालुकास्तरीय ग्रामीण क्रिकेट स्पर्धेमध्ये
नोट्रे डॅम अकॅडेमी स्कूल एनटीपीसीचा तिसरा क्रमांक
सोलापूर, दि. 5- ज़िल्हा क्रीडा परिषद व ज़िल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमेश्वर प्रशाला हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर येथे घेण्यात आलेल्या शालेय तालुकास्तरीय ग्रामीण क्रिकेट स्पर्धेमध्ये नोट्रे डॅम अकॅडेमी स्कूल एनटीपीसी संघाने तिसरा क्रमांक पटकाविलेला आहे.
१९ वर्षांखालील मुलींच्या गटात नोट्रे डॅम अकॅडेमी स्कूल एनटीपीसी संघाने आतिशय चुरशीच्या सामन्यांत बाजी मारून तिसरा क्रमांक पटकाविलेला आहे.या संघात जाणावी इंडी, अनुष्का दिंडोरे, श्राव्या सुतार, तमन्ना शेख, नक्षत्रा हुंजे, श्रद्धा बिराजदार, वैष्णवी बिराजदार, लावण्या पवार, समृद्धी माळी, सम्रुद्धी सलगर, श्रेया हल्ले, स्नेहा सागरे, संजीवनी अर्जुन, अवनी नांबियार, अनामिका सिंग या खेळाडूंचा समावेश आहे. त्यांना प्रशालेचे क्रीडाशिक्षक रेवणसिद्ध म्हेत्रे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल यशस्वी संघ व मार्गदर्शक शिक्षकांचे नोट्रे डॅम अकॅडेमी स्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर रंजना यांनी तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.














Leave a Reply