बलदवा हायस्कुलमधील शिक्षिका  शीला हावळे यांचे निधन 


0
Views

बलदवा हायस्कुलमधील शिक्षिका 

शीला हावळे यांचे निधन 

सोलापूर, दि. 3- देगाव तालुका उत्तर सोलापूर येथील सौ. गोपीबाई रामकिसन ( पापाशेठ ) बलदवा हायस्कुल मधील उपक्रमशील शिक्षिका शीला सुजित हावळे ( वय 47, रा. नालंदा नगर, विजापूर रोड ) यांचे शुक्रवार 2 ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांचा 1 ऑक्टोबर रोजी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अपघात झाला होता. त्यांच्यावर अश्विनी हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

 

शीला हावळे या शिक्षण परिषदेच्या प्रशिक्षणावरून आपले पती सुजित हावळे यांच्यासमवेत दुचाकीवरून परत येत होत्या. दुचाकी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर गतिरोधकाचा अंदाज न आल्याने त्या दुचाकीवरून खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला जोरात मार लागल्याने त्यांना बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा, आई, भाऊ असा परिवार आहे.

 

  • उपक्रमशील शिक्षिका 
  • शिला हावळे या उपक्रमशील शिक्षिका म्हणून ओळखल्या जात होत्या. त्या नेहमी विद्यार्थी आणि शाळेचे हित बघत असत. विद्यार्थ्यांना नेहमीच कोणत्या ना कोणत्या परीक्षांना बसवून त्यांची गुणवत्ता आणि विकास व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्या विद्यार्थी आणि शाळेच्या मदतीसाठी कायमच तत्पर असत. शाळेला आर्थिक निधी देण्याबरोबरच इतर मदतीला देखील कधीही त्यांनी हात आखडता घेतला नाही.

 

गेल्या महिन्यातच मिळाला होता पुरस्कार 

शिला हावळे यांना गेल्या महिन्यातच सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अतिशय हळव्या मनाच्या शिक्षिका गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

आज अंत्यसंस्कार 

शीला हावळे यांच्या पार्थिवावर आज शनिवारी दुपारी 1 वाजता मोदी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *