आमंत्रितांच्या राज्य कराटे स्पर्धेमध्ये शिवलीला स्पोर्ट्स कराटे अकॅडमीस 31 पदके 


0
Views

आमंत्रितांच्या राज्य कराटे स्पर्धेमध्ये

शिवलीला स्पोर्ट्स कराटे अकॅडमीस 31 पदके 

सोलापूर, दि. 5- सातारा येथे झालेल्या ओकिनावा मार्शल आर्ट्स कराटे इंटरनॅशनल आमंत्रितांच्या राज्य कराटे स्पर्धेमध्ये चॅम्पियन्स ऑफ चषक सन्मान सोलापूर संघास मिळाला. यामध्ये शिवलीला स्पोर्ट्स कराटे अकॅडमीस 11 सुवर्ण, 10 रौप्य व 10 कांस्य अशी 31 पदके मिळाली.

 

या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे 

कुमते प्रकारात (सुवर्ण) पदक विजेते सुदर्शन वाणीपरीट, आदित्य कदम, यशराज नवले, वैदही नवले, रणवीर बरगंडे, कबीर भोसले, शौर्य जगताप. 

काता प्रकारात सुवर्ण विजेते रसिका गायकवाड, प्रणव बनसोडे, चिंतामणी शर्मा, आयुष गुंड.

कुमते प्रकारात रौप्य पदक विजेते रसिका गायकवाड, चिंतामणी शर्मा, स्वराज भोसले, समृद्धी वाणीपरीट, धनश्री मुंदोडगी, भक्ती मोरे, प्रसाद सलगर.

काता प्रकारात कांस्य विजेते प्रसाद सलगर, कबीर भोसले, स्मरण यादव, युग भोसले.

कुमते प्रकारात कांस्यपदक विजेते स्मरण यादव, युग भोसले, आयुष्य गुंड. 

 

या स्पर्धा ओकिनावा मार्शल आर्ट्स कराटे इंटरनॅशनलचे ग्रँड मास्टर एस श्रीनिवासन, आयोजक योगेश मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी सोलापूर, पुणे, सातारा, अहिल्यानगर, मुंबई आदी जिल्ह्यांमधून सुमारे सातशे स्पर्धकांनी हजेरी नोंदवली. या स्पर्धेतील सर्व विजेत्या खेळाडूंना शिवलीला स्पोर्ट्स कराटे अकादमीचे मुख्य प्रशिक्षक शिवशरण वाणी परीट, सहाय्यक प्रशिक्षिका स्मिता वाणी परीट यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विजेत्या खेळाडूंचे आमदार देवेंद्र कोठे, आमदार विजयकुमार देशमुख, संतोष पवार, पद्माकर काळे, सचिन स्वामी आदी मान्यवरांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *