0
Views

स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूलचे
कुस्ती स्पर्धेमध्ये घवघवीत यश
सोलापूर, दि. 1- श्रीकृष्ण कुस्ती केंद्र, डोणगाव रोड, सोलापूर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूलचे मुलांनी 17 वर्षाखालील वयोगटातून घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेमध्ये अजिंक्य भोसले याने ग्रीक रोमन या प्रकारात प्रथम क्रमांक, सोहम मारकड याने फ्री स्टाईल या प्रकारात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. यातील अजिंक्य भोसले याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्याना क्रीडा शिक्षक प्रमोद म्हेत्रे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शाळेचे कमिटी अध्यक्ष पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त वृष्टी जैन, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र माळाळे, पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील, आय.एम.एस. ग्रुप ऑफ स्कूलचे सचिव अमोल जोशी , श्री साई महिला प्रतिष्ठानच्या सचिवा सायली जोशी , शाळा समन्वयक ममता बसवंती व मुख्याध्यापिका स्वाती कारंडे यांनी अभिनंदन केले.















Leave a Reply