सोलापूर शहरात लवकरच नवीन ई-बस धावणार


0
Views

सोलापूर शहरात लवकरच नवीन ई-बस धावणार

सोलापूर, दि. १ : सोलापूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने प्रस्तावित नवीन ई-बस सेवेसंदर्भात महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली महापौर कार्यालयात बैठक घेण्यात आली.

 

या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, सभागृहनेते नरेंद्र काळे, महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, माजी महापौर तथा नगरसेविका श्रीकांचना यन्नम, नगरसेवक गौतम कसबे, परिवहन उपक्रमाच्या नियंत्रण अधिकारी तथा संबंधित अधिकारी सारिका आकुलवार यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

बैठकीत शहरासाठी प्रस्तावित ई-बस सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक पायाभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ई-बस डेपोची सज्जता, बस चार्जिंग स्टेशन, दुरुस्ती व देखभाल सुविधा, पार्किंग व्यवस्था, ड्रेनेज, फायर सेफ्टी, CCTV, हायमास्ट प्रकाश व्यवस्था, प्रवेशद्वार, अंतर्गत विद्युत व्यवस्था तसेच EV Charging Infrastructure याबाबत चर्चा करण्यात आली.

 

ई-बसच्या चार्जिंगसाठी आवश्यक HT वीजजोडणी व वीजपुरवठ्याचे Energization हे महत्त्वाचे असल्याने संबंधित कामांना प्राधान्य देऊन पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच EV चार्जिंग पायाभूत सुविधांची चाचणी, कार्यान्वयन आणि प्रत्यक्ष संचालनासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.

 

सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमामार्फत डेपोच्या उर्वरित पायाभूत सुविधा कामांना गती देऊन ई-बस सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही प्राधान्याने करण्यात येत आहे. ई-बस सेवा सुरू झाल्यानंतर नागरिकांना सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

 

बैठकीस परिवहन उपक्रमाचे परिवहन व्यवस्थापक इरन्ना वन्यालोल्लू, कर्मशाळा अधीक्षक गिरीश आंटद, कनिष्ठ अभियंता सहा. व्यंकटेश गुडशेलू, लेखापाल तथा नोडल अधिकारी पीएम ई-बस गणेश काळे, मुख्य वाहतूक निरीक्षक सतीश गुंड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *