0
Views

शहरस्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धेत
अरिहंत स्कूलला उपविजेतेपद
सोलापूर, दि. 3- नुकत्याच पार पडलेल्या शहरस्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धेत अरिहंत स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत १४ वर्ष गटात उपविजेतेपद पटकावले.
या स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी सांघिक खेळ, जिद्द आणि आत्मविश्वासाचे उत्तम दर्शन घडवत प्रतिस्पर्धी संघ द.का.आसावा संघावर मात करत उल्लेखनीय कामगिरी केली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक आकाश आमदीपूर यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे अरिहंत स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला असून, शाळेतील क्रीडा क्षेत्राला मिळणाऱ्या प्रोत्साहनाचे हे फलित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन अजय पोन्नम, संचालिका सुलक्षणा पोन्नम, उपमुख्याध्यापिका तस्नीम शेख यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.














Leave a Reply