युवा महोत्सवासाठी शिवाजी महाविद्यालय सज्ज


0
Views

युवा महोत्सवासाठी शिवाजी महाविद्यालय सज्ज

बार्शी, दि. 27-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या युवा महोत्सवाला उद्यापासून (सोमवार) उत्साहात सुरुवात होत आहे. या महोत्सवाचे यजमानपद भूषविणाऱ्या श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथे जय्यत तयारी करण्यात आली असून, संपूर्ण परिसराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

 

28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2026 दरम्यान होणाऱ्या युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला असून, रंगीबेरंगी विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि विविध कलाविषयक प्रतिकृतींनी महाविद्यालय परिसर सजला आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या महोत्सवासाठी विविध विभागांकडून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी या महोत्सवाचे नियोजन केले आहे. रविवारी महोत्सवाचा अंतिम आढावा महोत्सव समितीने घेतला.

 

युवा महोत्सवात संगीत, नृत्य, नाट्य, ललित कला आणि इतर विविध कलाप्रकारांमध्ये विद्यार्थी आपली कला सादर करणार आहेत. त्यामुळे बार्शी नगरीत युवा कलावंतांचा उत्साह आणि सांस्कृतिक वातावरण पाहायला मिळणार आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या आयोजनाखाली होणाऱ्या या महोत्सवासाठी महाविद्यालय प्रशासन, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहाने कामाला लागले आहेत. उद्यापासून सुरू होणाऱ्या या सांस्कृतिक सोहळ्याकडे विद्यार्थी व कला रसिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *