0
Views

कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या सोलापूर
जिल्हाअध्यक्षपदी सिद्धार्थ जाधव यांची निवड
सोलापूर, दि. 19- कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या सोलापूर जिल्हाअध्यक्षपदी सिद्धार्थ जाधव यांची निवड करण्यात आली.
सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असून दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी सोलापूर शहर जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी जिल्हा परिषद येथील हिरवळीवर बैठक आयोजित करण्यात येणार आहे. सर्व शहर जिल्ह्यातील संघटनेची पदे भरून तालुका निहाय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची बैठक घेण्यात येणार आहे अशी माहिती कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाअध्यक्ष सिद्धार्थ जाधव यांनी दिली. संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते बोलत होते.
कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सतीश कांबळे यांच्या सहीने त्यांना हे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सतीश कांबळे , कार्याध्यक्ष बी. डी धुरंदर, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार जाधव, मुख्य संघटन सचिव परशराम गोंडाने यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या निवडीबद्दल दिव्यांग विभाग कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा अध्यक्ष मच्छिंद्र अंगुले यांच्या वतीने शनिवारी सत्कार करण्यात आला. यावेळी ज्ञानेश्वर होटकर, योगेश कबाडे, श्रीकांत बनसोडे, साईप्रसाद नाईकनवरे, प्रभाकर राजगुरू, प्रशांत खडाखडे आदीसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.















Leave a Reply