0
Views

लोटस योजनेतून 12 विद्यार्थ्यांना
2 लाख 91 हजार 514 रुपयांची शिष्यवृत्ती
सोलापूर, दि. 22- दक्षिण विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या लोकमंगल फाऊंडेशन संचालित ‘लोटस’ योजनेअंतर्गत 12 विद्यार्थ्यांना एकूण 2 लाख 91 हजार 514 रुपयांच्या शिष्यवृत्ती धनादेशाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास सद्गुरू ऑइल मिलचे मालक व व्यापारी प्रफुल्लभाई पटेल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच फाऊंडेशनचे संचालक मारुती तोडकर आणि लोटस कोअर कमिटीचे प्रमुख प्रा. विलास मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रा. विलास मोरे व प्रफुल्लभाई पटेल यांनी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी या संधीचा योग्य उपयोग करून शिक्षणात प्रगती साधावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी फाऊंडेशनच्या विभागप्रमुख दिपाली कोठारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.















Leave a Reply