देगाव येथे उद्या कर्मवीर जयंती सोहळा 


0
Views

देगाव येथे उद्या कर्मवीर जयंती सोहळा

सोलापूर, दि. 23- पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 139 वा जयंती सोहळा उद्या गुरुवार दि 24 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता देगाव तालुका उत्तर सोलापूर येथील सौ. गोपीबाई रामकिसन ( पापाशेठ ) बलदवा हायस्कुल येथे आयोजित करण्यात आला आहे.

 

या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माहेश्वरी प्रगती मंडल, महिला शाखा सोलापूरच्या अध्यक्ष स्नेहा पवन सोनी यांची तर प्रमुख वक्ते म्हणून एन बी नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सोलापूरचे डॉ. यशपाल मारुतीराव खेडकर हे उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कुल कमिटीचे सदस्य रामचंद्र जाधव हे असणार आहेत. त्याचबरोबर उद्योगपती नंदकिशोर बलदवा, स्थानिक स्कुल कमिटी सदस्य विश्वनाथ कराळे, शिवाजी कदम, गिरीष बलदवा, सोमराज गायकवाड, माजी मुख्याध्यापक मारुती मडवळी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी या समारंभास सर्व विद्यार्थी व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन मुख्याध्यापक वाय. एस. माळी, ज्येष्ठ शिक्षिका एस. एस. हावळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *