सिध्देश्वर फिजिओथेरपी कॉलेजचा 100 टक्के निकाल


0
Views

सिध्देश्वर फिजिओथेरपी कॉलेजचा 100 टक्के निकाल

सोलापूर, दि.18 – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या समर-2026 परीक्षेत श्री सिध्देश्वर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, सोलापूरच्या अंतिम वर्षाचा 100 टक्के निकाल लागला आहे. अंतिम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश संपादन करून महाविद्यालयाची 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली.

 

 

या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. या परीक्षेत अखीला वागती हिने 70 टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला. तर स्वरा गिरे आणि दीक्षा कदम या दोघी प्रत्येकी 66 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांकात उत्तीर्ण झाल्या. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीसोबतच प्राध्यापकांचे मार्गदर्शन, महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण आणि संस्थेच्या व्यवस्थापनाचे सहकार्य यामुळे हे यश मिळाल्याचे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले.

 

 

या यशाबद्दल श्री सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, विश्वस्त अ‍ॅड. आर. एस. पाटील, महादेव चाकोते, डॉ. राजेंद्र घुली, विलास कारभारी, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेशकुमार टी. यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *