जिल्हाधिकाऱ्यांकडून मंगळवेढा-सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी 


0
Views

जिल्हाधिकाऱ्यांकडून मंगळवेढा-सांगोला तालुक्यात

दुष्काळी परिस्थितीची पाहणी 

सोलापूर, दि. 2- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून मंगळवेढा-सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यात आली.

 

यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी पिकांचे नुकसान, पाणीटंचाई व चारा उपलब्धतेचा आढावा घेतला. तसेच पंचनामे सरसकट व अचूक करण्याचे निर्देश दिले.

 

यावेळी उपविभागीय अधिकारी अमित माळी, मंगळवेढा तहसीलदार मदन जाधव, सांगोला तहसीलदार बाळूबाई भागवत, मंगळवेढा व सांगोला तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ, संबंधित मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक तसेच संबंधित गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *