बापरे! शेतात आढळले 8 फुटी अजगर 


0
Views

बापरे! शेतात आढळले 8 फुटी अजगर 

लातूर, दि. 19- लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील सेलू येथील एका शेतकऱ्याच्या शेतात मध्यरात्रीच्या सुमारास 8 फुटी लांब अजगर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

 

 

सिद्धू माने असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते रात्रीच्यावेळी शेतात नेहमीप्रमाणे पाहणी करत असताना त्यांना शेतात भले मोठे अजगर दिसल्याने त्यांची घाबरगुंडी उडाली. यानंतर त्यांनी प्रसंगावधान राखत आपल्याच गावातील सर्प मित्र शक्ती कांबळे यांना सांगितले. यानंतर कांबळे हे लगेचच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अत्यंत शिताफिने त्या भल्या मोठ्या अजगराला पकडले. ही वार्ता थोड्याच वेळात सर्वत्र पसरल्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली. यानंतर कांबळे यांनी त्या अजगराला कोणतीही ईजा न होऊ देता पुन्हा त्याला निसर्गाच्या सानिध्यात सुरक्षितपणे सोडून दिले.

 

दरम्यान हे अजगर कोठून आले याची निश्चित माहिती समजू शकली नाही. या घटनेने परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतात फिरताना सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *