नगरसेविकेने शेतकऱ्यांप्रती केलेल्या ‘या’ कृतीचे सर्वत्र होत आहे कौतुक


0
Views

नगरसेविकेने शेतकऱ्यांप्रती केलेल्या

‘या’ कृतीचे सर्वत्र होत आहे कौतुक

सोलापूर, दि. 5- सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सातच्या नगरसेविका तथा कामगार समाज कल्याण समिती सभापती श्रद्धा किरण पवार यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजुरांसाठी आपले एक महिन्याचे मानधन जिल्हाधिकारी यांच्या निधी खात्यात वर्ग करा असे पत्र मनपा आयुक्त यांना दिले आहे. नगरसेविकेने शेतकऱ्यांप्रती केलेल्या या कृतीने सर्वत्र कौतुक होत आहे.

 

नगरसेविका श्रद्धा किरण पवार यांनी आपल्या या कृतीतून शेतकऱ्यांप्रती नुसतीच पोकळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृती करून एक आदर्श निर्माण केला आहे. सध्या पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्याला सरकारच्या तात्काळ मदतीची गरज आहे. नगरसेविका पवार यांनी आपले मानधन शेतकऱ्यांना देऊन त्यांच्या वेदनेवर फुंकर मारण्याचे काम केले आहे. आता पवार यांच्या या मोहिमेत मनपात शेकड्याने असलेल्या नगरसेवकांपैकी किती नगरसेवक सहभागी होतात हे पाहणे महत्वाचे आहे. नगरसेविका पवार यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *