महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने अभिवादन 


0
Views

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने अभिवादन 

सोलापूर, दि. 2- सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५७ व्या जयंतीनिमित्त तसेच भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांतून अभिवादन करण्यात आले.

 

सोलापूर रेल्वे स्टेशन येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माजी महापौर संजय हेमगड्डी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच काँग्रेस भवन येथे जय जवान जय किसान’ हा देशाच्या विकासाचा संदेश देणारे भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक प्रा. नरसिंह आसादे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, माजी महापौर अरिफ शेख, सुशीला आबुटे, माजी स्थायी समिती सभापती बाबा मिस्त्री, नगरसेवक प्रा. नरसिंह आसादे, कार्याध्यक्ष हणमंतु सायबोळु, महिला अध्यक्ष प्रमिला तूपलवंडे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, मागासवर्गीय विभाग अध्यक्ष सागर उबाळे, प्रवक्ता सेल अध्यक्ष नागनाथ कदम, यंग ब्रिगेड अध्यक्ष विवेक खन्ना, असंघटित कामगार सेल अध्यक्ष सुभाष वाघमारे, उद्योग व वाणिज्य सेल अध्यक्ष पशुपती माशाळ, विचार विभाग अध्यक्ष ऍड. करीमुन्नीसा बागवान, माजी नगरसेवक दत्तु आण्ण बंदपट्टे, सिद्धाराम चाकोते, भारती ईपलपल्ली, हरुण शेख, ब्लॉक अध्यक्ष शिवशंकर आंजनाळकर, एम. के. मुल्ला सर, उपाध्यक्ष विश्वनाथ साबळे, बसवराज म्हेत्रे, अंबादास गुत्तीकोंडा, रामसिंग आंबेवाले, ऍड. केशव इंगळे, अनिल मस्के, रुस्तुम कंपली, रमेश फुले, नागेश म्याकल, हाजी मलंग नदाफ, संजय गायकवाड, भीमराव शिंदे, माजी महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, सुमन जाधव, विणा देवकते, शोभा बोबे, शुभांगी लिंगराज, मुमताज तांबोळी, ज्योती गायकवाड, छाया हिरवटे, अनिता भालेराव, चंद्रकला निजमल्लू, तायरा शेख, रायचूर आलिमा शेख, कर रफिक चकोले, नूरअहमद नलवार, पुरुषोत्तम श्रीगादी, धीरज खंदारे, दिनेश डोंगरे, शिवाजी साळुंखे, गुलाम शेख, रफिक रामपुरे, ऍड. लक्ष्मण बनसोडे, शुकुर शेख, अभिलाष अच्युगटला, आयन नडिवले, बाशीद अरकरे, इब्राहिम कलबुर्गी, हाजी मेहमूद शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *